मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगरातील किमान तापमान आणि कमाल तापमान २० ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान असून शहर आणि उपनगरांमध्ये आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी २१.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २१.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारनंतर तापमानात एक ते दोन अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारतातील शीतलहरी आणि बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दिवसा कडक उन आणि रात्री, पहाटे गारठा अनुभवायला मिळत आहे.

world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
North Maharashtra gets colder Know why cold and how long
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जाणून घ्या, थंडी का आणि किती दिवस?
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
Piles of garbage on Filmcity Road photos viral on social media
फिल्मसिटी मार्गावर कचऱ्याचे ढीग; समाजमाध्यमावर चित्रे प्रसिद्ध होताच कचऱ्याची विल्हेवाट

हेही वाचा… मुंबई : मालमत्ता करवाढ न करण्यावर स्वाक्षरी, राज्यपालांच्या सहीनंतर आता केवळ अध्यादेशाची प्रतीक्षा

हेही वाचा… ‘मास्टर लिस्ट’मधील विजेत्यांची पुन्हा पडताळणी होणार! तक्रारींमुळे म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय

राज्यात ढगाळ हवामान अनुभवायला मिळत असतानाच, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. राज्यातील तापमानात वाढ, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अनेक भागात कमाल तापमान ३३ अंशांच्या वर आहे. मात्र, मुंबई शहर, तसेच उपनगरातील किमान तापमान स्थिर असल्याने मुंबईकरांना आणखी काही दिवस थंडी अनुभवायला मिळेल.