मुंबई : राज्यभरात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी परतली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर आल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही पारा खाली उतरण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचापासून अति थंड वारे (जेट स्ट्रीम) वाहत आहे. परिणामी उत्तर भारतातून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट पोहचली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने घसरून ८ ते ९ अंशांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नंदुरबार, धुळे जिल्ह्यांच्या काही भागात पहाटेचे तापमान दवांक बिंदूपर्यंत पोहचले आहे. उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटेचे किमान व दुपारचे कमाल तापमान सरासरी इतकेच आहे.

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
Rain in North Konkan Meteorological Department has predicted Mumbai news
उत्तर कोकणात आठवडा अखेरीस पाऊस? जाणून घ्या, हवामान विभागाचा अंदाज काय
Temperature maharashtra, climate change,
थंडी आणखी दोन दिवस; पुन्हा तापमान वाढणार, जाणून घ्या हवामानातील बदल कशामुळे
Mumbais maximum temperature rise with Santacruz recording 35 Celsius
मुंबईकर घामाघूम
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा
Large fluctuations in weather in Gondia state
महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…

हेही वाचा >>> चित्रनगरीतील कचऱ्याची जबाबदारी कोणाची ? महापालिका आणि फिल्मसिटी प्रशासनामध्ये समन्वय बैठक होणार

उत्तरेत थंडी लाट आल्यामुळे आणि पश्चिमी झंझावात सक्रीय राहण्याची शक्यता असल्यामुळे बुधवारपर्यंत (१८ डिसेंबर) थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हेही वाचा >>> तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू

जळगावात पारा आठ अंशांवर

राज्यात मंगळवारी जळगावात ८.० अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल नाशिक ९.४, नगर ११.७, पुणे १२.३, महाबळेश्वर १३.२, छत्रपती संभाजीनगर १२.२, परभणी १२.५, अकोला ११.८, अमरावती १२.३, बुलढाणा ११.४, नागपूर १२.०, वर्धा १२.४, कुलाबा २०.८, सातांक्रुज १८.० आणि डहाणूत १४.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Story img Loader