मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नवनियुक्त मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली. देशमुख यांची हत्या करणारे गुन्हेगार आणि त्यामागचे सूत्रधार यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असल्याचा पुनरुच्चार केला. या घटनेवरून मला राजकीय व सामाजिक जीवनातून उठविण्याचा काहींचा डाव असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) तातडीने पूर्ण करून गुन्हेगारांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात यावे व हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांच्या भोवताली निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर त्यांची बाजू मांडली. भाजपचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनीच मुंडे यांच्या विरोधात मोहीम उघडल्याने मुंडे यांची अधिकच पंचाईत झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी धस यांच्या वक्तव्यांवरून फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विरोधकांनाही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर खात्याचा सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले, देशमुख हत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि भयानक आहे. त्यामुळे त्यात सहभागी असलेल्या कुठल्याही आरोपीचे कोणाशीही संबंध असले किंवा तो कोणाच्याही जवळचा असला, तरी त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही, त्यामुळे सरकार या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
या घटनेच्या आडून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांकडून वेगळ्या पद्धतीचे राजकारण केले जात आहे. मला मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद मिळू नये, यासाठी या घटनेचे दुर्दैवी राजकारण केले गेले व यातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. काही जण माझ्यावर दररोज टीका करीत असून माझा या घटनेशी कसलाही संबंध नसताना तो जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेवटी कोणी कितीही आरोप केले, तरी या घटनेतील सत्य व मुख्य सूत्रधार समोर येईलच, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख माझा कार्यकर्ता; न्याय मिळेल पंकजा मुंडे
संतोष देशमुख हा माझा बुथ प्रमुख होता. निवडणुकीत त्याने माझे काम केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी देशमुख खून प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची पहिली मागणी मीच केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री असल्याने माझ्या लेकराला आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा न्याय देतील, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी व्यक्त केली. मंत्री झाल्यानंतर मुंडे यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यानंतर देशमुख प्रकरणावर मौन सोडले.
विशेष तपास पथकाची स्थापना
देशमुख हत्याप्रकरणी राज्य सरकारने सीआयडीतील उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली आहे. या प्रकरणीच्या तपासाची सूत्रे आता एसआयटी हाती घेईल आणि गुन्हेगारांना अटक करुन न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्याची जबाबदारी एसआयटीवर सोपविण्यात आली आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.
उद्धव ठाकरे जानेवारीत परभणी, बीड दौऱ्यावर
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परभणी आणि बीड दौऱ्यावर जाणार आहेत. परभणी येथील सूर्यवंशी कुटुंबीयांची, तर बीड येथे देशमुख कुटुंबीयांची भेट ते घेणार आहेत. परभणी आणि बीडमधील घटनांवरून विरोधकांकडून सरकारवर आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.