मुंबईत रस्ता मार्गावरून प्रवास करणं आणि वेळेत पोहचणं हे सध्या मोठं आव्हान झालंय. हा वाहतूक कोंडीचा त्रास केवळ मुंबईकरांनाच नाही, तर अगदी मंत्र्यांनाही भोगावा लागत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट मुंबई लोकलने प्रवासाला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे जयंत पाटलांनी याआधी देखील अशाचप्रकारे लोकलने प्रवास केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जयंत पाटील यांना डोंबिवलीला जायचं होतं. मात्र, रस्त्यावरून होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत त्यांनी सीएसएमटीवरून थेट ५ वाजून ५६ मिनिटांची टिटवाळा जलद लोकल पकडली. त्यांनी गार्ड कॅबमधून प्रवास केला. याआधी देखील त्यांनी अशाप्रकारे डोंबिवलीपर्यंतचा प्रवास मुंबई लोकलने केला आहे. जयंत पाटील यांनी अनेकदा आपल्या मंत्रीपदाचा बडेजाव न करता वेळप्रसंगी सामान्यांप्रमाणे प्रवासाला प्राधान्य दिलं आहे.

हेही वाचा : चिखल तुडवत, कार्यकर्त्याच्या बाईकवरुन तीन किमी प्रवास करत जयंत पाटलांनी केली तलावाची पाहणी

जयंत पाटलांचा मुंबई लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर प्रवास

दरम्यान, जयंत पाटील यांनी १३ नोव्हेंबरला सायंकाळी पक्षाच्या कामासाठी सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने प्रवास केला होता. खुद्द मंत्रीमोहदय लोकल प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटले होते.

मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडला. विशेष म्हणजे लोकलमध्येही जयंत पाटील शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले.