शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाहेर लग्न केलेल्या मुली आणि त्यांच्या कुटुंबात संवाद ठेवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती‘ असं या समितीचं नाव आहे. या समितीत मंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्य असणार आहेत. यावर बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी दिल्लीत निर्घृण हत्या झालेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख करत समितीचे उद्देश सांगितले. ते बुधवारी (१४ डिसेंबर) माध्यमांशी बोलत होते.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, “या समितीचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. आंतरधर्मीय विवाहानंतर ज्या मुला-मुलींचा आपल्या कुटुंबाशी संवाद थांबला त्यांच्यासाठी ही समिती आहे. त्या मुला-मुलींना कोणाला काही सांगावासं वाटलं तर त्यांच्यासाठी ही समिती आहे. आंतरधर्मीय विवाहानंतर कोणाला वाटलं की, मला परत कुटुंबाकडे परत जायचं आहे, तर ते या समितीशी संपर्क करू शकतात. आम्ही त्यांची मदत करू.”

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

सरकार पालकत्वाच्या नाही, तर संवादकाच्या भूमिकेत राहणार आहे. ही समिती १५ दिवसांमध्ये एक हेल्पलाईन जाहीर करेल. ज्यांना मदत हवी आहे ते यावर संपर्क करू शकता.

समितीचं काम काय असणार?

ही समिती नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत आंतरधर्मीय विवाहाच्या नोंदी ठेवेल. तसेच मुद्रांक शुल्क विभागाकडून आंतरधर्मीय विवाहांची संपूर्ण माहिती घेतली जाईल. याशिवाय अशा लग्नानंतर नवविवाहित तरुण आणि त्यांचे कुटुंबीय संपर्कात आहेत की नाही याची माहिती गोळ करेल.

हेही वाचा : VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान

दरम्यान, श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर राज्यात हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले. तसेच कथिक लव्ह जिहादचा आरोप करत त्याविरोधी कायद्याची मागणी केली. यानंतर आता आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

Story img Loader