मुंबई : अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राममंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार असून त्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. अयोध्येमध्ये नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ जानेवारी रोजी हे मंदिर खुले होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संपूर्ण देशभरातच यानिमित्ताने वातावरण निर्मितीही केली जात आहे. यानिमित्ताने भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मुंबईत अक्षता कलश यात्रांचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी श्रीराम कथांचे प्रवचन आयोजित करण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करावी, सर्व मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे आयोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यातच आता भाजपचे आमदार व कौशल्य, रोजगार, उद्याजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : शिवडी-न्हावाशेवा लिंक रोडवरील प्रवासासाठी भरावा लागणार २५० रुपयांचा टोल, मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब!

Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
BJP retains all important districts of Vidarbha in Guardian Minister post
विदर्भातील पालकमंत्री निवडीत भाजपचाच वरचष्मा
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

२२ जानेवारी रोजी सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन सार्वजनिक दीपोत्सवासाठी परवानगी द्यावी, अशीही मागणीही लोढा यांनी केली आहे. घाटकोपर येथील भाजपचे आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. अयोध्येमध्ये पाचशे वर्षांनंतर राममूर्तीची प्रतिष्ठापना होत असून हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या दिवसाला एखाद्या सणाचे महत्त्व आले आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करावी, अशी मागणी राम कदम यांनी पत्रात केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी, असेही कदम यांनी पत्रात नमुद केले आहे.

Story img Loader