मुंबई : अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राममंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार असून त्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. अयोध्येमध्ये नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ जानेवारी रोजी हे मंदिर खुले होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संपूर्ण देशभरातच यानिमित्ताने वातावरण निर्मितीही केली जात आहे. यानिमित्ताने भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मुंबईत अक्षता कलश यात्रांचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी श्रीराम कथांचे प्रवचन आयोजित करण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करावी, सर्व मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे आयोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यातच आता भाजपचे आमदार व कौशल्य, रोजगार, उद्याजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा