मुंबई : परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचे वांद्रे येथील अनधिकृत कार्यालय पाडून टाकण्याची कारवाई म्हाडाने तातडीने करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमय्या यांनी या बांधकामाविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन हे अनधिकृत कार्यालय पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. करोना संकटामुळे राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास उच्च न्यायालयाने राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांना ३० सप्टेंबरपर्यंत सरसकट मनाई केली होती. कारवाईविरोधात कोणालाही न्यायालयात याचिका करण्यास अडचणी येत असल्यास त्यांना दाद मागण्याची संधी मिळावी, या हेतूने हे मनाई आदेश देण्यात आले होते. ही मुदत गेल्या आठवड्यात आठ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. हा मुद्दा लोकायुक्तांपुढील सुनावणीत उपस्थित करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यावर कारवाई करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले होते. त्यामुळे म्हाडाने या मुदतीनंतर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी के ली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister of transport anil parab bandra unauthorized office akp
Show comments