मुंबई : मंत्रालय सुरक्षा कडक करण्यासाठी आणि विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने चेहरा ओळख प्रणाली (एफआरएस) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून मंत्रालयातील आठ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चेहरा ओळख माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित करण्यास विलंब लागत असल्याने या एफआरएस प्रणालीची एक फेब्रुवारीपासून अपेक्षित अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील सरकारच्या काळात मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाढत्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली होती. गृह विभागाने या वाढत्या अभ्यागत संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी एफआरएस तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गेली दोन महिने या प्रणालीवर माहिती तंत्रज्ञान विभाग काम करीत आहे. ही प्रणाली कार्यान्वित करण्यास एक महिन्याचा कालावधी लागेल, असे सुरक्षा विभागातील उच्च अधिकाऱ्याने सांगितले.

काय आहे एफआरएस तंत्रज्ञान

एफआरएस तंत्रज्ञान हे मंत्रालय सुरक्षा नियंत्रण विभागाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे ज्या खात्यात काम आहे, तेथेच जाण्याचे प्रवेशपत्र दिले जाणार आहे.

कर्मचाऱ्यांची माहिती संकलन अद्याप अपूर्णच

मंत्रालयात कायम स्वरुपी व कंत्राटी तत्वावर आठ ते नऊ हजार कर्मचारी आहेत. त्यांची संपूर्ण महिती संकलित करण्याचे काम केले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील ही महिती संकलित करण्यास विलंब लागला आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक असल्यास पाच ते सहा हजार अभ्यागत प्रवेश घेतात. मंत्रालयातील कर्मचारी, पत्रकार, अभ्यागत आदींची मोठी गर्दी होते. काही नागरिक आंदोलन करण्याचाही पवित्रा घेवून मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर उड्या मारण्याच्या काही घटना घडल्या आहेत. काही अभ्यागत इतर विभागात फिरत असल्याचे दिसून आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministrys updated frs security system delayed mumbai news amy