मुंबई : देवनार येथे रिक्षातून जाणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलीचा रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मानखुर्द परिसरात राहणारी पीडित  मुलगी आठ दिवसांपूर्वी देवनार परिसरात वास्तव्यास असलेल्या आजी-आजोबांना जेवण देण्यासाठी गेली होती. जेवण दिल्यानंतर ती रिक्षाने घरी परत येत होती. त्यावेळी आरोपी रिक्षाचालकाने मुलीला चेंबूर – वाशीनाका परिसरात नेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या ठिकाणी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिचा विनयभंग केला. मात्र संधी साधून मुलीने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घर गाठले. या घटनेनंतर घाबरलेली पीडित मुलगी घरात गप्प असायची. त्यामुळे कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. तिच्या कुटुंबियांनी शनिवारी याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.