बदलापूर पश्चिम भागात राहणाऱ्या इयत्ता चौथीतील एका नऊ वर्षीय मुलीवर वर्षभर तिघांकडून अत्याचार होत असल्याची संतापनजक घटना उघडकीस आली आह़े पीडित मुलीच्या आईने बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. यांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.
या दुर्दैवी मुलीवर इमारतीत सफाई काम करणाऱ्या बबन ऊर्फ नीलेश पवारची (२०) वाईट नजर होती. एक दिवस संधी साधून त्याने तिला पंप हाऊसमध्ये बोलावले. तिथे तिच्यावर अत्याचार करून या प्रकरणाची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता. त्याचा लहान भाऊ युवराज (१७) आणि मित्र नीलेश म्हसकरही या कृष्णकृत्यात सहभागी झाले.
चार दिवसांपूर्वी ही मुलगी नवी मुंबईत मावशीकडे गेली होती. तिथे पोटात दुखू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा