मुंबईः चित्रपटात काम करण्याची संधी देण्याच्या नावाखाली ओळख झालेल्या ४० वर्षीय चित्रपट कलाकाराने १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला आहे. याप्रकरणी अंधेरीतील डी.एन. नगर पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा – मुंबई : ग्रँटरोडमध्ये रस्त्यावर झाड पडले, बस मार्ग वळवावे लागले
हेही वाचा – छ. संभाजी नगरमधील अंदाजे ११५० तर नागपूरमधील ४५० घरांच्या सोडतीसाठी जानेवारीत जाहिरात
पीडित मुलगी मूळची गुजरातमधील रहिवासी आहे. आरोपीही मूळचा गुजरातमधील रहिवासी आहे. आरोपी पीडित मुलीच्या काकांच्या परिचयाचा होता. आरोपी तिला चित्रपटात काम करण्याची संधी देईल, या आशेने पीडित मुलीने आरोपीशी ओळख केली होती. अंधेरी येथील हॉटेलमधील खोलीत मुलगी एकटीच झोपली असल्याचा फायदा उलचून आरोपीने पीडित मुलीचा सोमवारी विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.