मुंबई : मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रीकरण कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या ५६ वर्षांच्या आरोपीला अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारालाही डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकारणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीला आरोपीने एका मुलासोबत मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्यासोबत बोलतानाचे चित्रीकरण मोबाइलवर केले. ते चित्रीकरण पीडित मुलीला दाखवून तिच्या पालकांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.