डोंबिवलीजवळील पिसवली गावातील एका तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या रामभवन बन्सी यादव (वय ४९) या व्यक्तीला मानपाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पीडित मुलीला रामभवन हा आपल्या मुलीप्रमाणे मानायचा. या नात्याचा गैरफायदा घेऊन घरी कोणी नसताना रामभवनने तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर रामभवनला अटक करण्यात आली. त्याल १ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Story img Loader