मुंबईत राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने आपल्या नावे इन्स्टाग्रामला बनावट खातं तयार करण्यात आलं असून न्यूड फोटो शेअर केले जात असल्याची तक्रार ऑक्टोबर महिन्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी इन्स्टाग्रामशी संपर्क साधत तात्काळ हे खातं डिलीट करायला लावलं होतं. पण पोलिसांना आरोपीचा शोध लागला नव्हता. पण अखेर पोलिसांना आरोपी सापडला असून तेदेखील चक्रावले आहेत. कारण आरोपी १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ वर्षीय तरुणीने गेल्यावर्षी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ऑक्टोबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता. आपल्या नावे इन्स्टाग्रामला बनावट अकाऊंट तयार करुन न्यूड फोटो शेअर करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली होती.

तरुणीचे काही वर्षांपूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हे न्यूड फोटो प्रेमसंबंध होते तेव्हा काढण्यात आलेले होते. काही वर्षांपूर्वी दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यामुळे संशयाची सुई त्याच्यावर होती.

एक्स-बॉयफ्रेंडच्या वडिलांच्या मोबाइलचा वापर

दरम्यान सेंट्रल रिजनच्या सायबर पोलिसांनी ज्या फोन क्रमांकावरुन हे अकाऊंट तयार करण्यात आलं त्याचा शोध घेत अखेर आरोपीपर्यंत पोहोचले. फोटो अपलोड करण्यासाठी ज्या फोनचा वापर करण्यात येत होता तो प्रियकराच्या वडिलांचा होता. त्यांच्या मोबाइलचा वापर करत आरोपीने हे फोटो अपलोड केले होते.

आरोपी ताब्यात

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून ती १६ वर्षांची मुलगी आहे. तक्रार करणाऱ्या मुलीच्या एक्स-बॉयफ्रेंडची ती प्रेयसी आहे. तरुणाचे ब्रेकअपनंतर या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. तिघेही एकाच परिसरात राहणारे आहेत.

द्वेषापोटी कृत्य –

यानंतर मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर पोलिसांनी आपल्याच प्रियकराच्या एक्स-गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या या १६ वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं आहे. फक्त द्वेषापोटी तिने हे कृत्य केलं होतं. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला अटक केली जाऊ शकत नाही. यामुळे तिला डोंगरीमधील बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl uploads nude photos of boyfriends ex girlfriend out of jealousy in mumbai sgy