मुंबई : वायव्य मुंबईत आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यामुळेच शिवसेनेला २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसला धूळ चारता आली. काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता. आता शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघातील समीकरणे निश्चितच बदलली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाजप तसेच काही प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे गटाबरोबर तर काँग्रेस व येथे फारसा आधार नसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट तसेच आम आदमी पक्ष ठाकरे गटाच्या पाठीशी आहे. त्यामुळे मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण अटळ आहे. यंदा अंधेरी पूर्व, दिंडोशी व जोगेश्वरी पूर्व येथे गेल्या वेळेपेक्षा कमी मतदान झाले आहे, तर उर्वरित तीन मतदारसंघांतील मतदानात वाढ झाली आहे.
मोठ्या संख्येने असलेल्या उत्तर भारतीयांमध्येही कट्टर शिवसैनिक व तितकेच भाजपवासी आहेत. काँग्रेसला एकूण मतदानाच्या ३० ते ४० टक्के मतदान गेल्या दोन निवडणुकांत झाले आहे. यंदा अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात मतदानाला उतरल्याचे पाहावयास मिळाले. त्यांच्यामुळे विशेषत: अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथे मतदान वाढले आहे. त्याचमुळे वायव्य मुंबईत अल्पसंख्याकांची हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> Mumbai North East Lok Sabha Constituency : मतांचे ध्रुवीकरण महत्त्वाचे ठरणार
शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर हेच लोकसभेचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले होते. मात्र ऐन वेळी रवींद्र वायकर शिंदे गटात गेल्यामुळे या समीकरणाला मोठा धक्का बसला. भाजपचा पाठिंबा असल्याने वायकर निर्धास्त होते; परंतु प्रत्यक्षात वायकर यांच्यासाठी भाजपचा कुठलाही नेता फिरकला नाही. याउलट कीर्तिकर यांच्यासाठी उद्धव व आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला. वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातही सारे आलबेल असल्याचे जाणवले नाही. ६० टक्के इतके उत्तर भारतीय, १५ ते २० टक्के मराठी, पाच ते सहा टक्के मुस्लीम व इतर उर्वरित असलेल्या मतदारसंघात यंदा गेल्या वेळेप्रमाणेच ५४ टक्के इतके मतदान झाले. पण यंदा गणित वेगळे आहे. वर्सोवा, गोरेगाव, अंधेरी र्पू्व येथे मतदानात झालेली वाढ ही प्रामुख्याने अल्पसंख्याकांची वस्ती असलेल्या वर्सोवा येथील यारी रोड तर अंधेरी पश्चिम येथील गुलशन कॉलनी, बेहरामबाग, मिल्लत नगर, जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी डोंगर, जुहू गल्ली येथे असल्याचे दिसून आले. ही मते कोणाच्या पारड्यात पडली, यावर वायव्य मुंबईचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेस आमच्याबरोबर असल्यामुळे ही मते ठाकरे गटाला मिळाल्याचा दावा कीर्तिकर यांचे कार्यकर्ते करतात तर या दोन्ही ठिकाणी अल्पसंख्याकांनी वायकर यांना मतदान केले आहे, असा दावा भाजपचे कार्यकर्ते करतात. अल्पसंख्याकांचे वाढलेले मतदान हेच उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे.