लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळेच दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) विलंब होत आहे. प्रकल्प पूर्णत्वासाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी जून २०२५ चा मुहूर्त धरण्यात आला आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरवासियांना मुलबक पाण्यासाठी आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Drugs worth Rs 485 crore seized by Mumbai Police in a year
मुंबई पोलिसांकडून वर्षभरात ४८५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
Ramdas Athawale On US Election Results 2024 :
Ramdas Athawale : ‘डोनाल्ड ट्रम्प आणि मी ‘रिपब्लिकन’ पक्षाचेच’, रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी!
Cheating of an army officer, ure of buying land,
कोकणात जमीन खरेदीच्या आमिषाने लष्करी अधिकाऱ्याची फसवणूक, लष्करी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
Maharashtra assembly elections
विश्लेषण: उमेदवारांच्या गर्दीमुळे छोट्या पक्षांची मते निर्णायक; समीकरणे कशी आहेत?
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 1
Bhool Bhulaiyaa 3 ठरला कार्तिक आर्यनचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट, पहिल्या दिवशी कमावले तब्बल…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातून पहिल्या टप्प्याअंतर्गत वसई – विरार महापालिकेसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. असे असताना मीरा-भाईंदरवासीयांना मुबलक पाणी पुरवठ्यासाठी मे २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दुसऱ्या टप्प्याचे आतापर्यंत ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दुसरा टप्पा मे २०२५ मध्ये पूर्ण होऊन कार्यान्वित होणार आहे.

आणखी वाचा- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना पुन्हा समन्स, अभिनेत्री गहना वशिष्ठलाही समन्स

वसई – विरार आणि मिरा – भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावून या शहरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १३२५.७८ कोटी रुपये खर्चाचा सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ४०३ दक्षलक्ष लीटर क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात झाली आहे. काम सुरू झाल्यापासून ३४ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणी, भूसंपादन आणि इतर अडचणींमुळे काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला. मात्र २०२१ नंतर एमएमआरडीएने कामाला गती दिली. त्यामुळेच जून २०२३ मध्ये या प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आणि त्यानंतर काही महिन्यांनी वसई – विरारला पहिल्या टप्प्यातून पाणीपुरवठा सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग देऊन आतापर्यंत तो कार्यान्वित होणे अेपक्षित होते. मात्र अद्याप हा टप्पा पूर्ण झालेला नसून मिरा – भाईंदरवासियांना मुलबक पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

आणखी वाचा- घाटकोपर फलक दुर्घटनाप्रकरणी माजी संचालिकेला जामीन

हा टप्पा मे २०२५ मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर मिरा – भाईंदर शहराला पाणीपुरवठा सुरू होईल असे सांगण्यात येत होते. मात्र ही तारीख उलटून गेली तरी दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. सध्या या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून चार किमीपर्यंतच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरू असून पाण्यांचा टाक्यांचेही काम सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. एकूणच मिरा – भाईंदरवासियांची तहान जून २०२५ नंतरच भागणार आहे.