प्रभाग अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर पाच दिवसानंतर काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात चार मुख्य आरोपी असून ३५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ चे अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना रविवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर  मारहाण केली होती व या मारहाणीचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिले होते. परंतु पाच दिवस उलटले तरी गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला  होता. त्यामुळे अखेर सुनील कदम, विकास फाळके, सचिन फोफळे, करण आणि ३५ व्यक्तींविरोधात काशीमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, शासकीय कामात अळथला आला असल्यास तसा अहवाल पालिका प्रशासनाकडे मागितला असून, त्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारें यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayander filed a case against those who assaulted the ward officer msr