मीरा-भाईंदर शहरातील वादग्रस्त ठरलेले व वर्षभरापूर्वी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या आज(२५ सप्टेंबर) वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा भाजपामधूनच सक्रिय राजकारणात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणुकीत अपक्ष आमदार गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. त्यानंतर तीन महिन्यांनीच २५ फेब्रुवारी २०२० रोजी मेहता यांच्यावर भाजपाच्याच एका नगरसेविकेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यामुळे मेहता यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन, राजकारण सोडल्याचे जाहीर केले होते. या काळात मेहता यांची एक चित्रफीत देखील व्हायरल झाली होती.

तर , कांदळवन क्षेत्रात अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले. त्यामुळे मेहता हे सक्रिय राजकारणात प्रत्यक्ष सहभागी न राहता मागून पक्षाची सूत्रे हाताळत होते. मात्र याने मीरा-भाईंदर भाजपात पक्षांतर्गत वादास सुरुवात होऊन दोन गट निर्माण झाले. यामुळे मेहता यांच्या वर्चस्वाला धक्का बसत असल्याने त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात त्यांनी आज (२५ सप्टेंबर) आपल्या वाढदिवशी राजकारणात पुन्हा पदार्पण करत असल्याचे जाहीर केले. शिवाय आपण मागील वर्षी पक्षातून राजीनामा दिला असला तरी तो अदयापही पक्षाने स्वीकारला नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण पूर्वी प्रमाणे सक्रिय कार्यकर्ता असून पक्षांचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले. शिवाय आगामी पालिका निवडणुकीपूर्वी पक्षातील सर्व वाद मिटवून आपण एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayander former mla narendra mehta rejoins bjp msr