मुंबईः सीमाशुल्क विभागाच्या आईसगेट संगणकीय प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेऊन कस्टम ड्युटी क्रेडिट स्क्रीप्टच्या (सीमाशुल्क कर परतावा ई-पावती) माध्यमातून १२ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. आरोपींनी आतापर्यंत गैरमार्गाने चार कंपन्यांच्या नावाने तोतयागिरी करून अशा ई-पावत्या मिळवल्या असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना सुरतमधून अटक केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांसह दिल्ली पोलिसही तपास करीत आहेत.

योगेशकुमार अरविंदलाल चलथानवाला (५३) व सुनील बद्रीप्रसाद बेंडे ऊर्फ सुनील पटेल (५५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनाही आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधील सूरत येथून अटक केली. पकडण्यात आलेले आरोपी मुख्य आरोपींच्या मदतीने हा गैरप्रकार करीत होते.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

हेही वाचा – मुंबई: उंच गतिरोधकांमुळे चालकांना बस चालवणे अवघड, दुमजली बसचा भाग दबला

आरोपी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कर परतावा न मागणाऱ्या कंपन्यांच्या नावाने नोंदणी करायचे. त्यासाठी कंपनीच्या संचालकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर केला जायचा. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या यंत्रणेमध्ये संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी बदलून त्याद्वारे कस्टम ड्युटी क्रेडिट स्क्रीप्ट मिळवायचे. त्यांची ते विक्री करीत होते. आरोपींनी आतापर्यंत वैभवी टेक्स फॅबल्स, मे. एस आर एन्टरप्रायजेस, फॅब्युलस कॉर्पोरेशन, जी. आर. एन्टरप्रायजेस या कंपन्यांच्या नावाने बनावट नोंदणी करून त्याद्वारे क्रेडिट स्क्रीप्ट मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील काही स्क्रीप्ट आरोपींनी तक्रारदार कंपनी मे. टॅम इंडिया यांना विकले. त्यांनी त्या स्क्रीप्ट वठवल्यानंतर संबंधित स्क्रीप्ट चोरीला गेल्याचे तक्रारदार कंपनीच्या एका संचालकाला दिल्ली पोलिसांकडून समजले. त्याबाबत दिल्ली पोलिसांकडे वैभवी टेक्स फॅबल्स यांनी तक्रार केली होती. माहिती मिळाल्यानंतर टॅम इंडियाचे संचालक श्रेयस मोरे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात, बनावट कागदपत्र तयार करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम बनावली व पांडुरंग गवते याच्या पथकाने गुजरातमधून चलथानवाला व पटेल या दोघांना अटक केली. आरोपींनी या स्क्रीप्टचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी अशा प्रकारे इतर कंपन्यांचीही फसवणूक केली आहे. आतापर्यंत हा अपहार १२ कोटी रुपयांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या ई स्क्रीप्ट मिळवणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा – Mumbai Crime : दादरला तुतारी एक्स्प्रेसमध्ये ट्रॉली चढवताना दोघांना घाम फुटला, बॅग उघडताच आढळला रक्ताने माखलेला मृतदेह

कस्टम ड्युटी क्रेडीट स्क्रीप्ट म्हणजे काय?

ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट हे भारत सरकारने निर्यात प्रोत्साहनासाठी सुरू केले होते. त्यात निर्यात करणाऱ्या कंपन्यांना निर्यात रकमेच्या तुलनेत ठरावीक कर परतावा मिळतो. हा कर परतावा ते वस्तू आयात करताना वापरू शकतात. पूर्वी हे प्रमाणपत्राच्या स्वरूपात मिळायचे. पण करोना काळात ई स्क्रीप्ट स्वरूपात त्याचे वितरण केले जाऊ लागले. फक्त निर्यात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आयात करणाऱ्या कंपन्यांना कायदेशिररीत्या अशा स्क्रीप्टची विक्री करू शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.