कंत्राटदार कंपनीचा पेपरफुटीचा प्रयत्न

कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक

woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

सायबर पोलिसांकडून टोळीचा छडा

मुंबई/पुणे : आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार रविवारी उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिणामी, म्हाडाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. 

भरती परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (रा. महेंद्रा अर्‍ँथया, खराळवाडी, पिंपरी, पुणे), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांच्यासह अन्य तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. म्हाडाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.  आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका

फुटीप्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास करण्यात येत असून, रविवारच्या (१२ डिसेंबर) म्हाडा भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरातील संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉइंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी आर्थिक फायद्यासाठी म्हाडाची प्रश्नपत्रिका फोडून ती उमेदवारांना देण्याची तयारी सुरू केली होती. त्यानंतर मध्यरात्री अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे म्हाडा परीक्षेतील तीन उमेदवारांची प्रवेशपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील ३५ उमेदवारांच्या नावाची यादी सापडली, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

म्हाडातील विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. या भरती परीक्षेसाठी म्हाडाने जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीची निवड केली होती. त्यानुसार रविवारी १२ डिसेंबर, १५ डिसेंबर, १९ डिसेंबर आणि २० डिसेंबरला म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांतील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती. १४ पदांच्या ५६५ जागांसाठी जवळपास पावणेतीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेसाठी दोन-तीन दिवस असताना परीक्षार्थींकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी? 

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. परीक्षेसाठी परीक्षार्थींकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. काही परीक्षार्थींनी आईचे मंगळसूत्र, शेतजमीन गहाण ठेवून दलालांना पैसे दिल्याच्याही तक्रारी आहेत. परीक्षार्थींची आर्थिक फसवणूक झाल्याची, परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर आव्हाड यांनी, या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती समाजमाध्यमाद्वारे शुक्रवारी दिली होती. त्यानुसार आव्हाड आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता यात घोटाळा असल्याचे उघड झाले. त्यानुसार सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि पेपरफुटीचा प्रयत्न शनिवारी हाणून पाडला.

परीक्षार्थींची नाराजी, आव्हाडांकडून माफी

रविवारी सकाळी म्हाडाच्या विभागीय मंडळातील विविध केंद्रांवर परीक्षा होणार होत्या. त्यामुळे अनेक परीक्षार्थी शनिवारी आपापल्या केंद्रावर पोहचण्यासाठी निघाले होते. पण रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात आल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले. त्यामुळे अनेक परीक्षार्थींना रविवारी सकाळी परीक्षेला जाताना परीक्षा रद्द झाल्याचे समजले. या प्रकारामुळे परीक्षार्थी प्रचंड नाराज आहेत. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबाबत क्षमा मागितली आहे. भरती परीक्षेचे शुल्कही परत करण्यात येणार असून, पुढे या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

काय घडले?

कंत्राटदार कंपनीच पेपरफुटीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती म्हाडा आणि ‘एमपीएससी’ची तांत्रिक समिती यांना मिळताच शनिवारी म्हाडा पुणे मंडळाने याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. कंपनीचा संचालक प्रीतिश याला भेटण्यासाठी दलाल येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजता विश्रांतवाडी येथून प्रीतिश आणि दोन दलालांना अटक केली. रविवारी औरंगाबादमधून आणखी दोन दलालांना अटक करण्यात आली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये पोलीस चौकशी करीत आहेत.

सर्व परीक्षा रद्द  :  सर्व भरती परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. यासंबंधीचे परिपत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.