मुंबई : विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचे शाळेतील समुपदेशनादरम्यान उघडकीस आले असून अखेर याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.

पीडित मुलगी १४ वर्षांची असून गावदेवी परिसरातील शाळेत शिक्षण घेत आहे. नुकतीच त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी ती रडायला लागली. तिला समुपदेशन करणाऱ्यांनी विश्वासात घेतले असता तिने तिच्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची माहिती त्यांना दिली. आरोपीने जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात पीडित मुलीचा सतत पाठलाग केला. तसेच तिचा विनयभंगही केला. या प्रकरणामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. पण भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर समुपदेशनादरम्यान मुलीने हा प्रकार संबंधितांना सांगितला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Crime News
Nagpur Crime : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक, मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Nandurbar teacher was extorted Rs 12 lakh after being trapped in pornographic film
नंदुरबारमधील शिक्षकाला मोहजाळात अडकवून १२ लाख रुपयांची मागणी
school Teacher misbehaved with girls
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

हेही वाचा – अंधेरीतील अंबानी रुग्णालयाशेजारी परवडणाऱ्या दरातील सुसज्ज रुग्णालय उभे राहणार, ८५ वर्षे वयाच्या डॉक्टरचा २५ वर्षांचा लढा यशस्वी!

हेही वाचा – २६/११ च्या हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी देविकाला अखेर घर मिळणार

पोलिसांनी तत्काळ मुलीची तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपी शिक्षकाविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader