दर वर्षी रस्ता अपघातात हजारो जणांचे प्राण जातात. त्यात अनेकदा पादचाऱ्यांचाच समावेश असतो, कारण अनेकदा रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसल्याने अपघात होतात. रस्ता ओलांडताना अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे पालन होतेच असे नाही. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी ‘हमराही स्टिक’ या अनोख्या काठीची निर्मिती करण्यात आली आहे. आयआयटी व के. जे. सोमय्याच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ही काठी तयार केली आहे.
एलईडी प्रकाशाची व्यवस्था या काठीत करण्यात आली आहे. वजनाला हलकी, वरच्या बाजूला धातू आणि खालील बाजूस लाकूड अशी या ‘हमराही स्टिक’ची रचना आहे. काठीच्या वरील बाजूला एक कळ असून ती दाबली असता वरील बाजूला लावलेले एलईडी लाइट प्रकाशमान होतात. लांबूनही हे लाइट्स दिसू शकतात. पहाटे किंवा रात्रीच्या अंधारात या काठीचा विशेष उपयोग होऊ शकतो. विशेषत: दृष्टिहिनांसाठी ही काठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठीच घडी करून ठेवता येईल अशीही या काठीची रचना आहे. केवळ रस्ता ओलांडतानाच नाही, तर जंगली प्राण्यांचा हल्ला रोखण्यासाठीही या प्रकाशमान काठीचा वापर होऊ शकतो. तसेच कुठे हरवल्यास शोधासाठीही ही काठी उपयुक्त ठरू शकते. काठीच्या एलईडीचा प्रकाश अर्धा किलोमीटपर्यंत दिसू शकतो.
अíपत चेलावत, मुकेश स्वामी हे मुंबई आयआयटीचे आणि के. जे. सोमय्या महाविद्यालयाचा ऋषभ छेडा या तीन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या काठीची निर्मिती केली असून राजेश गंगर या निर्मितीमागील प्रमुख प्रणेते आहेत.
काठीची ठळक वैशिष्टय़े
*एलईडी रिचार्जेबल
*मोबाइल फोन रिचार्ज जॅक
*वजनाला हलकी
*बॅटरी तीन तासांपर्यंत चालू शकते
*एलईडीचे कार्टरिज बदलवता येते

Story img Loader