कल्याणमधील एका प्रसिद्ध इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या वेळी एका विद्यार्थिनीचा एका तरुणाने विनयभंग केला असल्याची घटना उघडकीला आली आहे. फरार तरुणाचा बाजारपेठ पोलीस शोध घेत आहेत.
शुक्रवारी या शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होता. या वेळी विद्यार्थी, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आठवी इयत्तेत शिकणारी ही मुलगी स्नेहसंमेलनाला आली होती. या वेळी मितेश या तरुणाने या विद्यार्थिनीचे चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला आणि तेथून त्याने पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले. हा तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जाकिरला पोलीस कोठडी
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याबद्दल रामनगर पोलिसांनी अटक केलेल्या समतानगर झोपडपट्टीतील जाकिर शेख याला मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जाकिर हा रिक्षाचालक आहे. त्याचे राजाजी रोडला राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. या मुलीला जाकिरने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आजीने पोलीस ठाण्यात केली होती. शेखला अटक केल्यानंतर त्याने, चार वर्षांपासून या मुलीबरोबर आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.       

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Missbehave with girl in kalyan