ठाणे : माजिवाडा भागातील अल्पवयीन मुलीचा एका व्यापाऱ्याने शुक्रवारी विनयभंग केला. या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कापुरबावडी पोलिसांनी सांगितले, बाळकूम येथे राहणाऱ्या राजू पवार याचे माजिवडा नाका येथे झेरॉक्सचे दुकान आहे. त्याच्या दुकानात मुलगी झेरॉक्स काढण्यासाठी आली होती. त्यावेळी राजूने तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी सांगितल्यावर त्याच्या विरूद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader