रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेचा  विनयभंग केल्याची घटना समता नगर येथे शुक्रवारी दुपारी घडली. पोलिसांनी याप्रकरणी मयूर देढिया (३३) याला अटक केली आहे.
कांदिवली येथे राहणारी ३६ वर्षीय महिला शुक्रवारी दुपारी आपल्या मुलीच्या शाळेतील कार्यक्रमासाठी जात होती. समतानगर येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास मयूर देढिया याने रिक्षा अडवून तिला बाहेर खेचले आणि तिचा विनयभंग केला.
या महिलेने आरडाओरड केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या देढियाला नागरिक आणि बीट मार्शलनी पकडले. त्याला अटक करण्यात आली असून तो दहिसर येथील जवाहिराच्या दुकानात काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो या महिलेला त्रास देत होता. सदर महिलेने  यापूर्वीही देढियाच्या विरोधात समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

Story img Loader