ऐंशी ते नव्वदच्या दशकापर्यंत हरवलेल्या व्यक्तींची माहिती देणारा साधारण पाच मिनिटांचा ‘आपण यांना पाहिलंत का?’ कार्यक्रम दूरदर्शनवर रोज चालत असे. एकच वाहिनी असल्याने टीव्हीवरील पुढच्या कार्यक्रमाची वाट पाहात असताना समोर येणारी छायाचित्रे आणि संबंधित व्यक्तीची माहितीदेखील उत्सुकतेने पाहण्याचे ते दिवस होते. त्या वेळी परिसरांतील भिंतीवर ‘आपण यांना पाहिलंत का?’ असे लिहून खाली हरवलेल्या पाळीव कुत्र्या, मांजराचे फोटो लावण्याचा खोडसाळपणा हा विनोदाचा विषय ठरत होता. आता मात्र तेव्हाचा खोडसाळपणा गांभीर्याने घेतला जाणारा भाग आहे. खरेच आपण यांना पाहिलंत का? म्हणत हरविलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी संस्था सज्ज झाल्या आहेत. ‘कुत्रं कधी तरी पळून जायचंच किंवा मांजर घरोघरी फिरायचंच’ हे समज प्राणीपालकांमध्ये बेजबाबदारपणाचे ठरू लागल्याने हरवलेल्या प्राण्यांची आणि त्यांच्या पालकांची पुनर्भेट घडवून आणणारी ‘पेट लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड सव्‍‌र्हिस’ किंवा ‘मिसिंग पेट फाइंडर्स संकेतस्थळे, सेवा पशुपालकांसाठी दिलासा ठरल्या आहेत.

फिरायला सोडलेले कुत्रे किंवा मांजर परत आलेच नाही, पिंजऱ्याचे दार नीट लागले नाही आणि पक्षी उडून गेले अशा परिस्थितीत शेजारी, भवताली विचारणे किंवा वाट पाहणे या पलीकडे प्राणी-पक्षी मालकाच्या हाती काही नसते. असहायतेचा अनुभव देणाऱ्या या दिशाहीन शोधमोहिमेला थोडे शिस्तबद्ध स्वरूप हरवलेल्या कुत्र्यांचा शोध घेणाऱ्या सेवांनी दिले. श्वान किंवा पक्षी विकत घेण्यासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च आणि त्याहीपेक्षा मोठा जिव्हाळा यामुळे हरवलेल्या प्राण्याचा शोध घेणारी यंत्रणा ही आता पशुपालकांची गरज बनली आहे. एकमेकाला मदत करण्याच्या हेतूने समाजमाध्यमे, संकेतस्थळे या माध्यमातून पाळीव प्राण्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे. हरवलेल्या श्वानाचे किंवा मांजराचे छायाचित्र अपलोड करायचे, प्राणी कुठून हरवला, कोणत्या परिस्थितीत हरवला त्याची माहिती, प्राण्याची काही वैशिष्टय़े असतील तर ती, त्याच्या सवयी असे तपशील ‘प्राणीपालकां’नी द्यायचे. त्याचप्रमाणे, सापडलेल्या प्राण्यांचे तपशील प्राणिप्रेमी, स्वयंसेवी संस्थांकडून या संकेतस्थळावर दिले जातात. या दोन्ही तपशिलांची पडताळणी करून हरवलेला प्राणी शोधण्याचा प्रयत्न करायचा अशा स्वरूपांत या संकेतस्थळांचे काम चालते. सध्या समाज माध्यमे हा हरवलेल्या प्राण्यांच्या शोधमोहिमेतील मोठा घटक आहे. वेगवेगळ्या संस्था, प्राणिप्रेमींकडून सुरू करण्यात आलेली फेसबुक पेजेस आणि ट्विटर हॅण्डल्सचा हरवलेल्या प्राण्यांचा शोध घेण्यात मोठा वाटा आहे. अगदी प्रत्येक शहरातील प्राणिप्रेमी आपापले गट करून ही शोधमोहीम चालवत आहेत.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार

जीपीएस कॉलर्स

भारतात अजूनही हरवलेल्या पाळीव प्राण्यांचा शोध घेणाऱ्या या सेवेने मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक स्वरूप स्वीकारलेले नाही. मात्र प्राणी हरवूच नये म्हणून जीपीएस प्रणाली असलेले पट्टे (कॉलर्स) हा चांगला पर्याय ठरला आहे. ऑनलाइन बाजारात तर आहेतच, पण प्राण्यांची उत्पादने विकणाऱ्या दुकानांमध्येही हे पट्टे सहज मिळतात. दिसायला साधारण नेहमीच्या गळ्यातील पट्टय़ासारखे दिसणाऱ्या या पट्टय़ांत (कॉलर्समध्ये) जीपीएस प्रणाली असलेले उपकरण बसवलेले असते. हा पट्टा गळ्यात असलेला श्वान जेथे जाईल त्याचे ठिकाण गुगल मॅपवर दिसू शकते. श्वानाला फिरायला सोडले किंवा ते पळून गेले, कुणी पळवून नेले तर या पट्टय़ातील जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून श्वानाचा ठावठिकाणा कळू शकतो. श्वानाला एकटय़ालाच फिरायला सोडल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणेही या पट्टय़ांच्या माध्यमातून शक्य आहे. साधारण दीड ते दोन हजार रुपयांपासून अगदी १५ हजार रुपयांपर्यंत या पट्टय़ांची किंमत आहे. काही पट्टय़ांना ब्लूटूथच्या माध्यमातून फोनला जोडणे शक्य आहे. पट्टय़ाला असणाऱ्या छोटय़ा  स्पीकरच्या माध्यमातून श्वानाला तुमची हाकही ऐकू येऊ  शकते. त्यामुळे फिरण्याची वेळ संपल्यानंतर किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या भागांत श्वान जातो आहे असे लक्षात आल्यास त्याला बोलावणेही शक्य असते.

Story img Loader