ऐंशी ते नव्वदच्या दशकापर्यंत हरवलेल्या व्यक्तींची माहिती देणारा साधारण पाच मिनिटांचा ‘आपण यांना पाहिलंत का?’ कार्यक्रम दूरदर्शनवर रोज चालत असे. एकच वाहिनी असल्याने टीव्हीवरील पुढच्या कार्यक्रमाची वाट पाहात असताना समोर येणारी छायाचित्रे आणि संबंधित व्यक्तीची माहितीदेखील उत्सुकतेने पाहण्याचे ते दिवस होते. त्या वेळी परिसरांतील भिंतीवर ‘आपण यांना पाहिलंत का?’ असे लिहून खाली हरवलेल्या पाळीव कुत्र्या, मांजराचे फोटो लावण्याचा खोडसाळपणा हा विनोदाचा विषय ठरत होता. आता मात्र तेव्हाचा खोडसाळपणा गांभीर्याने घेतला जाणारा भाग आहे. खरेच आपण यांना पाहिलंत का? म्हणत हरविलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी संस्था सज्ज झाल्या आहेत. ‘कुत्रं कधी तरी पळून जायचंच किंवा मांजर घरोघरी फिरायचंच’ हे समज प्राणीपालकांमध्ये बेजबाबदारपणाचे ठरू लागल्याने हरवलेल्या प्राण्यांची आणि त्यांच्या पालकांची पुनर्भेट घडवून आणणारी ‘पेट लॉस्ट अॅण्ड फाऊंड सव्र्हिस’ किंवा ‘मिसिंग पेट फाइंडर्स संकेतस्थळे, सेवा पशुपालकांसाठी दिलासा ठरल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा