पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनाच्या प्रांगणात बेदम मारहाण करणारे आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. ठाकूर आणि कदम हे दोघेही स्वतःहून पोलिसांपुढे शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही पूर्ण केली. पोलिसांनी दोन्ही आमदारांना न्यायालयात हजर केले आहे.
सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मंगळवारी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, मनसे आमदार राम कदम यांच्यासह अन्य १५ आमदारांवर सरकारी अधिकाऱ्याला मारहाण, बेकायदा जमाव करणे, जीवे मारण्याची धमकी आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १४३, ३४१, ३५३, ५०४, ३२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सूर्यवंशी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी केवळ क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांचेच नाव घेतले आहे. अन्य आरोपींना आपण ओळखू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी बुधवारी संध्याकाळी विधानभवनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोघांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Story img Loader