शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित झाला. आमदार मनिषा चौधरी यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचं सांगत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी या प्रकारामुळे शीतल म्हात्रेंचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, अशी काळजी व्यक्त केली. त्या सोमवारी (१३ मार्च) सभागृहात बोलत होत्या.

मनिषा चौधरी म्हणाल्या, “एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा कुणी मॉर्फ केला त्याला शोधून काढावं.”

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल

“उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते, कारण…”

“आज हा प्रकार आज एका आमदार आणि पहिलेबरोबर झाला, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो ते आम्ही व्हिडीओत बघितलं. त्या उद्घाटनाला मीही उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते,” असं मनिषा चौधरी यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

“…तर त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो”

“एखादा माथेफिरू नवरा असेल, तर त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. एखादा पुरुष आमदार असेल, तर त्या महिलेचं डोकं फिरून तीही त्या पुरुषाला आपल्या संसारातून बाहेर काढू शकते,” असंही चौधरींनी नमूद केलं.

“या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल”

यामिनी जाधव म्हणाल्या, “शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. त्या माझ्या सहकारी आणि नगरसेविका होत्या. राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं.”

हेही वाचा : VIDEO: “खत हवं असेल, तर जात सांगा”, जयंत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, “शेतकऱ्याला त्याची…”

“या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल”

“यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ती विवाहीत महिला आहे. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत,” अशी मागणी यामिनी जाधव यांनी केली.