महाराष्ट्रात करोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. यामध्ये लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुन्हा एकदा धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान, अद्यापही मंदिरं उघडण्यात आली नसल्यामुळे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर तिव्र शब्दात टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यापुर्वी देखील भाजपाने लोकांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याबद्दल ठाकरे सरकारवर टीका केली होती. सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. त्यांनी धर्मापेक्षा मद्यविक्रीला प्राधान्य दिले, अशी टीका भाजपाने केली होती.

दरम्यान, “हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार महाराष्ट्रात आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे म्हणाले, “महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार, कारण हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे. हिंदू हो… तो डर के रहो.. ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र !!, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.”

यापुर्वी देखील नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. “लोकल चालू ..१७ ऑगस्ट पासून शाळा चालू… मग दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटकरत महाविकासआघाडी सरकावर टीका केली होती.