करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा – नव्या वर्षात मुंबईत दोन मेट्रो मार्ग पुर्ण क्षमतेने, मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये सेवेत

काय म्हणाले प्रसाद लाड?

“महापालिकेचा १२ हजार कोटींचा घोटाळा म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार मातोश्रीच्या मंडळींनी केला आहे. करोना काळात इमर्जंसी दाखवून बेड, औषधांस इतर साहित्य खरेदी करण्यात आली. त्यात जवळजवळ ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला. या प्रकरणात कोणकोणत्या नातेवाईकांचा समावेश होता? कशा पद्धतीने या साहित्यासाठी कंत्राटं देण्यात आली? हे जनतेपुढे यायला हवं”, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

हेही वाचा – “वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंचं विधान!

“करोना काळात अजमेराची ३ हजार कोटींची जमीन खरेदी करण्यात आली, ती कशासाठी करण्यात आली? या व्यवहारात आदित्य ठाकरेंचा सहभाग होता का? एकंदरीत कोणी-कोणी मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं? हे सर्व कॅगच्या अहवालातून स्पष्ट होईल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – MIDC भूखंडांत सुभाष देसाईंनी कोट्यवधींचा ‘मलिदा’ खाल्ला आणि उद्धव ठाकरेंनाही पोहचवला – रवी राणांचा गंभीर आरोप!

“माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. कॅगचा अहवाल आल्यानंतर शांत बसू नका. करोना सारख्या महामारीच्या काळात जनेतेचे हाल करून स्वत: चे खिशे भरण्याचे काम ज्यांनी केले आहे. त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करावी”, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Story img Loader