बोरिवलीच्या काजूपाडा येथील मैदानाच्या जागेवरील अतिक्रमणाच्या विरोधात उपमहापौर मिठबावकर व आमदार प्रवीण दरेकर यांनी आंदोलन केले असले तरी मुळातच ही जागा मैदानासाठी आरक्षित नसून ती खासगी मालकीची असल्याचा दावा या जागेचे मालक सुबोध माने यांनी केला आहे. तसेच या जागेबाबत पालिकेने नोटीस दिल्यानंतर दिंडोशी न्यायालयाने त्यावर ‘जैसे थे’चे आदेश जारी केल्याचेही माने यांनी म्हटले आहे.
काजूपाडा येथील सव्‍‌र्हे क्रमांक २०४ ‘अ’ ही जागा माझ्या वडिलांसह तीन भागीदारांनी १९८१मध्ये विकत घेतली होती. एक एकर दहा गुंठे जागेवर तीन चाळी बांधण्यात आल्या असून त्याचा करही पालिकेला नियमितपणे भरण्यात येत आहे. येथील २०० चौरस मीटर मोकळी जागा माझ्या मालकीची असून त्यावर मैदानाचे आरक्षण नसल्याचे माहितीच्या अधिकाराखालील कागदपत्रेच सुबोध माने यांनी सादर केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आमच्या कुटुंबीयांच्या मालकीचा भूखंड खेळाचे मैदान दाखविण्याचा उद्योग लोकप्रतिनिधी कोणत्या कारणासाठी करतात, असा सवालही त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा