विधानभवनात पोलीस अधिकाऱ्यास बेदम मारहाण
* ठाकूर, कदम यांच्यासह अन्य १५ आमदारांवर गुन्हे
* आमदारांवर कडक कारवाईची शरद पवार, राज ठाकरे यांची मागणी
* .. अन्यथा न्यायालयात दाद मागणार- रिबेरो
वांद्रे- वरळी सी लिंकवर आमदाराशी हुज्जत घालून दंड आकारला, म्हणून विधान भवनात पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून राज्यातील काही आमदारांनी विधिमंडळाच्या वास्तूत मंगळवारी लज्जास्पद इतिहास घडविला. लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकाराच्या नावाने लोकशाहीच्या वास्तूत आमदारांनी केलेल्या या ठोकशाहीमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवर पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आपली गाडी अडवून आपल्याला शिवीगाळ करून उद्धट वर्तन केल्याचे सांगत बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी विधानसभेत विशेष हक्कभंगाची सूचना मांडली. या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या धमकीचे रेकॉर्डिग आपण केले असून, या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही त्यास पाठिंबा दिला. याबाबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगताच सर्वपक्षीय सदस्य आक्रमक झाले. या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे याबाबत गटनेत्यांशी चर्चा करण्याकरीता अध्यक्षांनी २० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
त्याच वेळी काही आमदारांनी सूर्यवंशी यांना विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या कार्यालयासमोर गाठून बेदम मारहाण केली. वाचवा वाचवा असे ओरडत सूर्यवंशी गॅलरीतून पळत असताना क्षितीज ठाकूर, राम कदम, राजन साळवी, जयकुमार रावळ आदी आठ ते दहा आमदारांनी त्यांना गाठून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा