ठाकूर, कदम यांच्यासह अन्य १५ आमदारांवर गुन्हे
मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार
विधानभवनात पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मंगळवारी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, मनसे आमदार राम कदम यांच्यासह अन्य १५ आमदारांवर सरकारी अधिकाऱ्याला मारहाण, बेकायदा जमाव करणे, जीवे मारण्याची धमकी आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर भारतीय दंडविधान
संहितेच्या कलम १४३, ३४१, ३५३, ५०४, ३२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती
पोलिसांनी दिली.
काय आहेत ही कलमे
* १४३- बेकायदा जमाव (सहा महिन्यापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही)
* ३४१- एखाद्याला अन्यायकारक रित्या प्रतिबंध (एक महिना कारावास किंवा ५०० रुपये दंड किंवा दोन्ही)
* ३५३- सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला (दोन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही)
* ५०४-सार्वजनिक शांततेचा भंग (दोन वर्षे कारावास दंड किंवा दोन्ही)
* ३२३- दुखापत (एक वर्ष कारावास, दंड किंवा दोन्ही)
* ५०६ (२) – जीवे ठार मारण्याची धमकी (दोन वर्षांपर्यंत कारावास)
सूर्यवंशी यांनीच धमकावल्याचा आमदारांचा आरोप
पोलीस उप निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सदनाच्या गॅलरीत येऊन आमदारांशी हुज्जत घातली, एवढेच नव्हे तर ‘तुला काय करायचे ते कर, हक्कभंग मांडायचा असेल तर खुशाल मांड’ असे बोलत सूर्यवंशी यांनीच आमदारांशी हुज्जत घातली. त्यामुळे आमदार संतप्त झाले आणि त्यातून हा प्रकार घडला असून सूर्यवंशी यांनीच धमकावल्याचा आरोप आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम आदींनी केला आहे. सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची सर्व जबाबदारी आपण स्वीकारत असून आपली लढाई पोलिसांविरूद्ध नसून सूर्यवंशीसारख्या मुजोर अधिकाऱ्यांविरूद्ध असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
वैद्यकीय अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करू – पोलीस आयुक्त
या घटनेची आम्ही सखोल चौकशी करत असून सूर्यवंशी यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना आमदारांनी केलेल्या मारहाण प्रकरणानंतर पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग आदी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.
या घटनेबाबात आयुक्त सिंग यांनी सांगितले की, वांद्रे – वरळी सी लिंकवर वाहनांची तपासणी सुरू होती. सूर्यवंशी यांच्यासोबत दोन अन्य अधिकारी होते. त्यावेळी वेगाने वाहने चालविणाऱ्या अन्य १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यावेळी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या (एमएच ४८ ए १) या वाहनाची वेगमर्यादा जास्त असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात वाद झाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरे यांच्या दालनात हे प्रकरण मिटविण्यातही आले होते. परंतु मंगळवारी ही दु:खद घटना घडली.
सूर्यवंशी यांनी मारहाण करणाऱ्या आमदार ठाकूर आणि राम कदम यांची ओळख पटवली आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून दोषींवर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सूर्यवंशी यांना मुका मार लागला असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाय धरून माफीचा आमदारांचा हेका
ठाकूर, कदम यांच्यासह अन्य १५ आमदारांवर गुन्हे मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार विधानभवनात पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मंगळवारी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, मनसे
First published on: 20-03-2013 at 05:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mlas makes the remission appeal