कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील विविध न्यायालयीन प्रकरणी किती खर्च झाला त्याची माहिती देण्यास मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) नकार दिला आहे. माहिती अधिकारांतर्गत हवी असलेली न्यायालयीन खर्चाची माहिती ही ग्राहक आणि वकील यांच्यातील विशेषाधिकार असल्याचे सांगून एमएमआरसीने ही माहिती नाकारली आहे.
हेही वाचा >>>नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित; मुंबईतील शिवडी न्यायालयाचा दणका
मेट्रो ३ मार्गिकेतील आरे कारशेडला आरेवासीय तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून कारशेडचा वाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. कारशेडसह या मार्गिकेतील वृक्षतोड, ध्वनीप्रदुषणाविरोधातही न्यायालयात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरसीकडे आरे कारशेडप्रकरणातील न्यायालयीन खर्चाची माहिती मागितली होती. त्यावर मेट्रो ३ च्या विधी खात्याचे सहाय्यक महाव्यवस्थापक यांनी ही माहिती देण्यास नकार दिला आहे.