मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आरे वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या कारशेडच्या कामात अडथळा बनणारी ८४ झाडे कापण्याची आवश्यकता असून ही झाडे कापण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. एमएमआरसीएलने ८४ झाडे कापण्यासंबंधी मुंबई महानगरपालिकेला सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती या प्रतिज्ञापत्रानुसार करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मुंबईः तरूणीवर पित्याकडून लैगिंक अत्याचार; पित्याला अटक

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

शिंदे-फडणवीस सरकारने जुलैमध्ये ‘मेट्रो ३’ची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत उभारण्याची घोषणा करीत कामाला सुरुवात केली. आरे वसाहतीमधील झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. असे असतानाही वृक्षतोड करीत कामास सुरुवात केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला असून याप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आहे. आरे वसाहतीत एकही झाड कापू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकार आणि एमएमआरसीएलला बजावले. दरम्यान, याबाबतची याचिका प्रलंबित असताना बुधवारी एमएमआरसीएलने एक प्रतिज्ञापत्र सादर करून ८४ झाडे कापण्याची परवानगी मिळावी अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

‘मेट्रो ३’ प्रकल्पास विलंब झाला असून आता मात्र हा प्रकल्प लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने एमएमआरसीएलने कामाला वेग दिला आहे. सीप्झ ते बीकेसी दरम्यानचा टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत, तर बीकेसी ते कफ परेड टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरसीएलचे नियोजन आहे. हे दोन्ही टप्पे सेवेत दाखल करण्यासाठी आरे कारशेडचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार एमएमआरसीएलने यासाठी जुलै २०२३ चे उद्दिष्ट ठेवले आहे. याअनुषंगाने कामाला वेग देण्यासाठी आरेतील ८४ झाडे कापण्याची गरज आहे. यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे २०१९ मध्ये अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्याची विनंती एमएमआरसीएलने आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे.