मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार असून या कक्षा ३० सप्टेंबरपर्यंत कार्यरत राहणार आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळी, तसेच प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, निर्माण होणाऱ्या अडचणीचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> “आता तर कहर झाला”, अजित पवारांचा ‘त्या’ प्रकारावरून सरकारवर हल्लाबोल; विचारला ‘हा’ सवाल!

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मेट्रो, मुंबई पारबंदर प्रकल्प, सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्प, ऐरोली – कटाई नाका जोडरस्ता, तसेच भुयारी मार्ग, शिवडी – वरळी उन्नत मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारित एमयूआयपी – ओएआरडीएसअंतर्गत विविध रस्ते, पूल, उड्डाणपूल अशा विविध प्रकारच्या कामांचा यात समावेश आहे. या कामाच्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात पावसाळ्यात पाणी साचते, झाडे उन्मळून पडतात, वाहतूक कोंडी होते, अपघात आदी दुर्घटना घडतात. दुर्घटना होऊ नये वा झाल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी एमएमआरडीएकडून दरवर्षी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येते.

संपूर्ण पावसाळ्यादरम्यान हा कक्ष कार्यान्वित असतो. या नियंत्रण कक्षाअंतर्गत २४ तास तक्रारींचा पाठपुरावा करून मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे आदी संस्थाच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत समन्वय साधण्यात येतो. तसेच माहितीची देवाण घेवाण करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. या नियंत्रण कक्षातील अधिकरी, कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये  कार्यरत असणार आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करतानाच एमएमआरडीएने सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना केल्या आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: पोटनिवडणुका टाळण्याकडे पक्षांचा कल?

प्रकल्पाच्या ठिकाणी रस्ता रोधक उभे करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर वेळोवेळी जमा होणाऱ्या चिखलाची ताबडतोब विल्हेवाट लावणे इत्यादी सूचनांचा त्यात समावेश आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी यंत्रणा नसलेल्या, तसेच पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अतिरिक्त क्षमता असलेले पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आल्याची माहिती महानगर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, मोबाइल क्रमांक ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ (टोल फ्री) वर १ जून, २०२३ पासून संपर्क साधल्यास नागरिकांना नियंत्रण कक्षाकडून मदत मिळू शकेल.