मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) शिवडी-वरळी उन्नत मार्ग मुंबईतील सर्वात उंच उन्नत मार्ग ठरणार असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. हा उन्नत मार्ग आंबेडकर नगर मोनोरेल स्थानकावरून जाणार असून या ठिकाणी तो जमिनीपासून १५ ते ३० मीटर इतका उंच असणार आहे. साधारण नऊ मजली इमारती इतकी त्याची उंची असणार आहे.

हेही वाचा- ‘नोकऱ्यांमध्येही १८ वर्षांखालील अनाथांना एक टक्के आरक्षणाचा लाभ शक्य?’ उच्च न्यायालयाची विचारणा

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्प हा मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी करणार आहे. दक्षिण मुंबईतून या सागरी सेतूवर झटपट पोहचणे सोपे व्हावे, वरळीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा या हेतूने एमएमआरडीएने शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा सागरी सेतू आणि मुंबई महानगरपालिकेच्या सागरी मार्गालाही जोडणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला एमएमआरडीएने वेग दिला आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ३१.४१ टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२४ मध्ये हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

हेही वाचा- ‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’:आणखी एका विभागाची निविदा वादात

शिवडी-वरळी उन्नत मार्गाची अनेक वैशिष्ट्य आहे. रेल्वे मार्ग, रेल्वे स्थानक आणि मोनोरेल स्थानक ओलांडून हा उन्नत मार्ग जाणार आहे. हा मार्ग जमिनीपासून १५ मीटर ते २७ मीटर इतका उंच असणार आहे. मात्र आंबेडकर नगर मोनोरेल स्थानकावरून जाताना या उन्नत मार्गाची उंची ३० मीटर असेल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. हा मुंबईतील सर्वात उंच उन्नत मार्ग असेल, असा दावाही त्यांनी केला आहे.