सेंच्युरी मिल संक्रमण शिबीर परिसरातील खड्ड्यात पडून रविवारी वरळी बीडीडीमधील रहिवाशाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पातील सल्लागार कंपनीला दिले आहेत. सल्लागाराचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमएमआरडीए पुढील कार्यवाही करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ बरखास्तीचा निर्णय बेकायदा : उच्च न्यायालय; महाराष्ट्र कुस्तीगीर संघावरील अधिकाराचा वाद

वरळी बीडीडीतील इमारत क्रमांक ९ मधील रहिवासी प्रदीप आंबेकर (५८) यांना सेंच्युरी मिल संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले होते. रविवारी दुपारी ते बाहेर जात असताना सेंच्युरी मिल येथील रस्त्यावरील खड्डयात पडले. त्यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर बीडीडीवासियांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. म्हाडाने संक्रमण शिबीर परिसरात सोयी-सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत, असा आरोपही करण्यात आला. ही दुर्घटना एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पात घडल्याचे समोर आले आहे. उन्नत रस्त्याच्या मार्गिकेवरील खड्ड्यात पडून आंबेकर यांचा मृत्यू झाला असून एमएमआरडीएतर्फे या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एमएमआरडीएने मात्र या दुर्घटनेसाठी मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरले आहे.

हेही वाचा- २० नोव्हेंबरला लोकल भायखळा, वडाळय़ापर्यंतच; कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

प्रकल्पस्थळी महानगरपालिकेने काही कामानिमित्त खड्डा केला आणि दुसरा दिवशी पुन्हा काम करायचे म्हणून तो तसाच ठेवला. याच खड्ड्यात आंबेकर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. असे असले तरी प्रकल्प एमएमआरडीएचा असल्याने आणि यात नेमकी चूक कोणाची हे तपासण्यासाठी उन्नत रस्ता प्रकल्पातील सल्लागाराला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सल्लागाराकडून यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर दोषींविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कंत्राटदाराकडून मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदतही देण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda has sought a report from the consultant regarding the century mill sankraman camp incident mumbai print news dpj
Show comments