मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने याच परिसरातील तीन भलेमोठे जाहिरात फलक हटविण्याचा निर्णय घेतला आहे. हे फलक हटविणे आव्हानात्मक असून यासाठी मोठ्या क्रेन, तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची गरज पालिकेला भासणार आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर सोमवारी बचावकार्यात सहकार्य करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महापालिकेला मदत केली जाणार आहे.

घाटकोपर दुर्घटनेनंतर पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अशा वेळी अग्निशमन दल, पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची वाहने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. पण त्याआधीच एमएमआरडीएचे ६० जणांचे पथक आपल्या अत्याधुनिक यंत्रणांसह घटनास्थळी रवाना केले. पेट्रोल पंपवर जाहिरात फलक पडल्याने तो हटविण्याचे आव्हान पालिकेसमोर होते. एमएमआरडीएच्या मदतीमुळे बचावकार्य वेळेत आणि यशस्वीपणे पार पाडले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त फलक उभारणाऱ्या कंपनीचे या परिसरात तीन मोठे जाहिरात फलक आहेत. हे फलक तात्काळ हटविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एक-दोन दिवसांत हे फलक हटविण्यात येणार आहेत. हे फलक हटविण्यासाठी पालिकेने एमएमआरडीएकडे मदत मागितल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The fake SBI branch was opened in Chhattisgarh's Sakti district
SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?
Law Student Theft Case
Law Student Theft Case : गर्लफ्रेंडचा शॉपिंग आणि आयफोनचा हट्ट पूर्ण करण्यासाठी कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी करायचा चोरी; ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…
CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप
sahyadri sankalp society work for growth and conservation of ratnagiri forests
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन

हेही वाचा : मुंबई: रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पातील ‘वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेचे काम घाटकोपर परिसरात सुरू आहे. या कामासाठी अत्याधुनिक उपकरणांचा, भल्या मोठ्या क्रेनचा वापर केला जात आहे. एमएमआरडीएकडे तज्ज्ञ अधिकारी, मोठा कर्मचारी वर्ग आहे. एमएमआरडीएच्या ६० जणांच्या पथकाची आणि उपकरणांची मोठी मदत पालिकेला झाली. त्यामुळे पालिकेने एमएमआरडीएकडे मदत मागितली आहे. त्यानुसार एमएमआरडीए पालिकेला आवश्यक ती सर्व मदत, उपकरणे, मनुष्यबळ पुरविणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.