खापर मात्र रेल्वे आणि पर्यावरण खात्यावर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकारणाच्या स्थापनेपासून मुंबई आणि महानगर प्रदेशाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्राधिकरणाने हाती घेतलेले प्रकल्प आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या सोयी सुविधा यांची जंत्रीच ‘एमएमआरडीए’ने १०० पानाच्या श्वेतपत्रिकेत (प्राधिकरणाने मात्र याला माहिती पुस्तिका म्हटले आहे) मांडली आहे.
बहुतांश प्रकल्प रखडल्यामुळे त्यांचा खर्च काही कोटींनी वाढला असून काही प्रकल्पांच्या खर्चात तर अडीच ते तीन पटीने वाढ झाली आहे. मात्र येथेही हे प्रकल्प ‘एमएसआरडीसी’ राबवित असून आम्ही केवळ निधी देत असल्याचे सांगून या किंमतवाढीचे खापरही राष्ट्रवादीवरच फोडण्यात आले आहे. तसेच मेट्रो, मोनो हे प्रकल्प रखडलेले नसून नियोजनाप्रमाणे सुरू असल्याचा दावाही प्राधिकरणाने केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 सांताक्रुझ-चेंबूर हा प्रकल्प दोन टप्यात राबविण्यात येत असून पहिल्या टप्याच्या कामाचे जुलै २००३मध्ये कार्यदेश देण्यात आले. नोव्हेंबर ३००४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याची अट होती. तर दुसऱ्या टप्यासाठी मे २००४ मध्ये कार्यादेश देताना मे २००६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. ११७ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाची किंमत आता ४५० कोटींच्या घरात पोहोचली असून अजूनही ३० टक्के काम बाकी आहे. डिसेंबर २०१३पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय ते आणिक आगार या पूर्व मुक्त मार्गाचे जानेवारी २००८मध्ये सुरू झालेले काम तीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असताही ते लांबले आहे. साहजिकच याचा खर्च ३९३ कोटीवरून ७५० कोटींवर जाऊन पोहोचला आहे. आणिक पांजरपोळ जोड रस्त्याचे कामही दोन वर्षांत पूर्ण होण्याची अट असताना एप्रिल २००८मध्ये सुरू झालेले हे काम आतापर्यंत केवळ ७० टक्यापर्यंत पोहोचले आहे. मात्र त्याचा खर्च १४८ कोटीवरून २२१ कोटीच्या घरात पोहोचला आहे. पश्चिम द्रूतगती महामार्ग ते आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या सहारा उन्नत मार्गाचे २००९मध्ये सुरू झालेले काम मे २०१३मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून दोन किमी लांबीच्या या प्रकल्पातील सुधारित किंमत २८० वरून ३२० कोटी झाली आहे.    

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda project expenditure incresed