मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पावसाळय़ातील तक्रारींच्या निवारणासाठी नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. पावसाळय़ात प्रकल्पस्थळी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालावे, रस्ता खणल्यानंतर तेथील दगड-माती तातडीने हलवावी, अशा सूचनाही कंत्राटदारांना दिल्या आहेत.
‘एमएमआरडीए’तर्फे सध्या मुंबईत मेट्रो रेल्वे, मोनोरेल, पूर्व मुक्त मार्ग, सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता आदी प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांच्या परिसरात पावसाळय़ादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
ज्या ठिकाणी सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही व ज्या ठिकाणी पाणी जास्त साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी अतिरिक्त क्षमता असणारे पाण्याचे पंप सज्ज ठेवण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
पावसाळय़ात झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षाकडून मदत मिळू शकते. अनपेक्षित घटना आणि धोक्याच्या शक्यतेबाबत जनतेकडून माहिती मिळाल्यासही कक्षाकडून दखल घेतली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा