मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘पॉड टॅक्सी सेवा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या उभारणी, देखभाल आणि संचालनासाठी एमएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या.

‘ईदच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी आणा’

या निविदेला दक्षिणेतील दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. तेव्हा आता या निविदेत हैदराबाद येथील साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बाजी मारली आहे. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत बुधवारी निविदेला मान्यता देण्यात आली. यासाठी साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने लंडनमधील मेसर्स अल्ट्रा पीआरटी या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे बीकेसीतील पॉड टॅक्सी सेवा देण्यासाठी लंडनमधील ही कंपनी साई ग्रीन मोबिलिटी कंपनीला मदत करणार आहे.