मिरा-भाईंदर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. कार्यालयात मद्यपान करत असल्याचा मनसे कार्यकर्त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यावर आरोप केला आहे. या संदर्भात काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक-६ चे अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना सोमवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालय बाहेर मारहाण केली, विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, प्रकाश कुलकर्णी कार्यलयात निवृत्त अधिकरी दादा साहेब खेत्रेसह मद्यपान करत होते. तसेच, प्रभाग कार्यालयाच्या बाहेर तशा दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या असल्याचेही मनसे कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. तर, प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन, वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, घटनास्थळी दारूच्या बाटल्या पोलिसांना मिळाल्या नसून, या प्रकरणी लिखीत तक्रार आल्या नंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, काशीमिरा पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns activists beat up municipal officer in mira bhayander msr