महिन्याभरात दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा
मुंबईतील वाहतुकीचे नियमन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या उड्डाण पुलांच्या दुरुस्तीवरून मनसे- शिवसेना एकमेकांपुढे ठाकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ‘मनसे’चे वर्चस्व असलेल्या परिसरातील चार उड्डाणपुलांची दुरुस्ती करण्यास कंत्राटदार पुढे न आल्यामुळे पेच निर्माण झाला असून प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेने हे षडयंत्र रचल्याचा आरोप ‘मनसे’कडून करण्यात आला आहे. तसेच निविदा मागवून एक महिन्याच्या आत या पुलांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘मनसे’च्या नगरसेवकांनी दिला आहे.
स्थायी समितीच्या २८ डिसेंबरच्या बैठकीमध्ये मुंबईतील २१ उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र त्यामध्ये केशवसूत पूल, करीरोड पूल, एलफिन्स्टन पूल आणि कटारिया पूल यांचा समावेश नव्हता. या संदर्भात ‘मनसे’च्या नगरसेवकांनी चौकशी केली असता सदर चार पुलांच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदारांनी निविदाच भरली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या चार पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.
‘मनसे’चा प्रभाव असलेल्या परिसरात हे चारही उड्डाणपूल येत असल्यामुळेच त्यांची दुरुस्ती सत्ताधारी नेते मंडळी अडवून धरीत आहेत, असा आरोप ‘मनसे’च्या नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. कंत्राटदारांनी निविदांना प्रतिसाद न दिल्यामुळे पुन्हा निविदा का मागविण्यात आल्या नाहीत, असा सवाल ‘मनसे’च्या नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळेच सत्ताधारी शिवसेना सुडाचे राजकारण करीत आहे, असा आरोपही मनसेकडून करण्यात आला.
या चार पुलांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निविदा मागवाव्यात आणि एक महिन्याच्या आता त्यांची दुरुस्ती पूर्ण करावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा नगरसेवकांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिलेल्या पत्रात दिला
आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा