भाजप-सेना-रिपाइं महायुती आघाडी सरकारचा पराभव करण्यासाठी समर्थ आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्यास अनेकदा जाहीर विरोध करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनीच रविवारी मनसेसाठी दार किलकिले केले. राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणायचे असेल तर सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. म्हणूनच राज ठाकरे यांनीही महायुतीत यावे, असे जाहीर आवाहन आठवले यांनी रविवारी कुर्ला येथील जाहीर सभेत बोलताना केले.
रिपाइंच्यावतीने आठवले यांची मोठी सभा कुर्ला पूर्व येथील नेहरूनगर येथे रविवारी संध्याकाळी पार पडली. त्यात बोलताना मनसेला महायुतीत सहभागी होण्याचे निमंत्रण देत ही युती बळकट करण्याचा प्रयत्न आठवलेंनी  केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपचे नेतेही राज ठाकरे यांनी महायुतीत यावे यासाठी आग्रही होते. परंतु आठवले यांचा आतापर्यंत राज ठाकरे यांना तीव्र विरोध होता. तसेच राज ठाकरे महायुतीत येणार असतील रिपाइं आठवले गट महायुतीत राहण्याबाबत पुनर्विचार करेल असे आठवलेंनी वारंवार म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यकर्ता नक्षलवादाकडे जाणार नाही
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हा नक्षलवादाकडे जाणार नाही. काही तरुण थोडेसे भरकटले असतील तरी त्यांना पुन्हा आम्ही आंबेडकरी चळवळीत आणू. उलट नक्षलवाद्यांनीच आंबेडकरी चळवळीत यावे, असे आवाहन आठवले यांनी केले. नक्षलवाद्यांनी निळा झेंडा हाती घ्यावा, आम्ही त्यांचे स्वागत करू, असे ते म्हणाले.