महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पाठीच्या दुखण्यातून बरे झाल्यानंतर ठाकरे यांनी सोमवारी रवींद्र नाट्य मंदिरात राज यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे पक्षाच्या पुणे ग्रामीणमधील तीन लोकसभा मतदारासंघांसाठी पक्ष निरीक्षक पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. मात्र या बैठकीनंतर रवींद्र नाट्य मंदिरमधून बाहेर पडताना राज ठाकरेंनी आपली गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील माजी शहराध्यक्ष आणि भोंगा प्रकरणानंतर नाराजी नाट्यामुळे चर्चेत आलेल्या वसंत मोरेंना आपल्या कारमध्ये बसण्याचे आदेश दिले. हा सारा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच घडला. यासंदर्भात वसंत मोरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहा, आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून भेटीगाठी वाढवा अशा सूचना आणि मार्गदर्शन केल्यानंतर राज मेळावा संपल्यानंतर घराच्या दिशेने रवाना झाले. मात्र रवींद्र नाट्य मंदिरच्या मुख्य प्रवेशद्वारावर राज यांना निरोप देण्यासाठी वसंत मोरे आणि अन्य काही पदाधिकारी उभे होते. राज यांची गाडी प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर थांबली आणि राज यांनी हातांनी इशारा करुन वसंत मोरेंना कारच्या फ्रंट सीटवर चालकाच्या बाजूला बसण्यास सांगितलं. राज यांच्या सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला आणि वसंत मोरे राज ठाकरेंच्या कारमध्ये बसून रावाना झाले. निघण्याआधी कारमध्ये बसल्या बसल्या वसंत मोरेंनी खिडकीची काच मात्र आवर्जून खाली केल्याचं पहायला मिळालं. राज यांनी वसंत मोरेंना दिलेल्या या स्पेशल ट्रीटमेंटची चर्चा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

याचसंदर्भात बोलताना वसंत मोरे यांनी आपण यापूर्वीही राज यांच्या कारने प्रवास केला आहे, असं मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “राज ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं की या पुढे बसा, जरा गप्पा मारुयात. या गप्पा काय झाल्या हे सांगाल का? आधीचं नाराजी नाट्य वगैरे अशा बऱ्याच गोष्टी पुलाखालून गेल्या आहेत. पण आज राज ठाकरेंशी काय गप्पा झाल्या?” असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला. यावर वसंत मोरेंनी त्यांच्या स्टाइलमध्ये, “अहो राज ठाकरेंच्या गाडीमध्ये काय वसंत मोरे राज ठाकरेंच्या मनात आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया दिली. “मी पहिल्यांदा बसलेलो नाही राज ठाकरेंच्या कारमध्ये. दोन-तीन वेळा त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवलेलं आहे,” असंही मोरे यांनी सांगितलं.

“मी दारामध्ये उभा होतो, मला साहेब म्हणाले तू घरी येतोय ना? मला पर्यावरण अहवालाच्या वर्षपूर्तीचं प्रकाशन करायचं होतं. मी त्यांच्याकडे वेळ मागितली होती. ते मला म्हणाले तू घरी येतोय का? मी हो म्हटल्यानंतर त्यांनी मला, बस पुढं असं सांगितलं,” अशी माहिती मोरे यांनी दिली. त्यानंतर गाडीमध्ये नेमक्या काय गप्पा झाल्या यासंदर्भात बोलताना वसंत मोरेंनी, “गाडीमध्ये मी त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. दोन महिन्यानंतर मी त्यांना भेटलो होतो. मी दोन महिन्यांपूर्वी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फार ताण जाणवत होता. आज त्यांना भेटलो तेव्हा म्हणलो, तुम्हाला भेटल्यावर फार बरं वाटलं मला कारण आज तुमच्या चेहऱ्यावर बिलकुल ताण दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी जो आजारपणाचा ट्रेस पाहत होतो तो आज दिसत नव्हता. घरी जाईपर्यंत बऱ्याच गप्पा झाल्या,” असं सांगितलं.

या बैठकीमध्ये पक्षाच्या पुणे ग्रामीणमधील तीन लोकसभा मतदारासंघांसाठी पक्ष निरीक्षक पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून पुणे ग्रामीणमधील मावळ, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारासंघांतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. बारामतीमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना वसंत मोरेंनी, “मला कल्पना नव्हती की मला ही जबाबादारी देतील. आम्हाला फक्त येथे थांबण्यास सांगितलं होतं. नंतर मला व्हॉट्सअपवर पत्र आलं. मला अनिल शिदोरेंचा फोन आला आणि इतरही नेत्यांनी फोन करुन माझं अभिनंदन केलं,” असं सांगितलं.

Story img Loader