महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पाठीच्या दुखण्यातून बरे झाल्यानंतर ठाकरे यांनी सोमवारी रवींद्र नाट्य मंदिरात राज यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे पक्षाच्या पुणे ग्रामीणमधील तीन लोकसभा मतदारासंघांसाठी पक्ष निरीक्षक पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. मात्र या बैठकीनंतर रवींद्र नाट्य मंदिरमधून बाहेर पडताना राज ठाकरेंनी आपली गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील माजी शहराध्यक्ष आणि भोंगा प्रकरणानंतर नाराजी नाट्यामुळे चर्चेत आलेल्या वसंत मोरेंना आपल्या कारमध्ये बसण्याचे आदेश दिले. हा सारा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच घडला. यासंदर्भात वसंत मोरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा