मुंबई: गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्रासाठी चांगले नाही. सध्याचे शिंदे-फडणवीसांचे सरकार हा सत्तेचा तात्पुरता आर्थिक समझोता असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली.

मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी शिवसेनेवरही  टीकास्त्र सोडले. तसेच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ आली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Dombivli Raj Thackeray meeting, Raj Thackeray,
डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Sharad Ponkshe present on the platform of MNS meeting in Thane news
शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर
Raj Thackeray on Code of Conduct
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Raju Patil criticizes Eknath Shinde and his son Shrikant Shinde
जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रांवर घणाघात

मनसेने कोणतेही आंदोलन अर्धवट सोडले नाही. आपल्या आंदोलनामुळे राज्यातील ६५ टोलनाके बंद झाले. टोलचा पैसा सगळय़ा पक्षांकडे जातो, असा आरोप करतानाच टोलमुक्त महाराष्ट्रचे आश्वासन देणाऱ्यांनी सत्तेत असताना त्याची पूर्तता का केली नाही याबद्दल त्यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्या आंदोलनामुळेच ९२ टक्के मशिदीवरील भोंगे बंद झाले असून मुस्लिमांकडूनही या आंदोलनाचे स्वागत करण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी या वेळी केला.

छगन भुजबळ, नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामील झाले. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून पक्षातून बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आपल्याकडे वास्तू नसली तरी विचारांचा वारसा आहे. बाळासाहेबांचे विचार आहेत असे नमूद केले.

पदाधिकाऱ्यांना इशारा :

पक्षातील अंतर्गत वाद सोशल मीडियावर कमेंट करून काढला तर त्याला क्षणभरही पक्षात ठेवणार नाही. तुम्ही प्रमुख पदांवर असाल तर त्या पदाची शान राखली पाहिजे. पक्षाने ज्या पदावर तुमची नेमणूक केली आहे, त्याचा आदर केला पाहिजे. बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये होणारा धुडगूस चालू असेल तो चालू दे. मी आपल्या पक्षामध्ये हे चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना दिला.